धक्कादायक!  'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या तरुणीवर जीवघेणा हल्ला, कुठे घडली घटना ?
धक्कादायक! 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या तरुणीवर जीवघेणा हल्ला, कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर
राज्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे सर्रासपणे घडत आहेत. आजकाल तरुणांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये  राहतात, परंतु  या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये  मधून देखील अनेक मोठमोठ्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, आता अशीच एक धक्कादायक घटना सोलापुरातून समोर आली आहे. 

सोलापूर शहरातील बसवेश्वर नगरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला क्रूर शिक्षा दिली आहे. आरोपीनं आपल्या प्रेयसीला बेदम मारहाण करत टोकदार वस्तूने वार केले आहेत. या हल्ल्यात पीडित तरुणी जखमी झाली आहे. या प्रकरणी सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तौफीक महिबूब सय्यद असं गुन्हा दाखल झालेल्या २४ वर्षीय आरोपी प्रियकराचं नाव आहे. शनिवारी पहाटे त्याने अचानक आपल्या प्रेयसीला बेदम मारहाण केली. फोन का उचलत नाही, असा जाब विचारत आरोपीनं ही मारहाण केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांना टोकदार लोखंडी वस्तूने प्रेयसीवर वार केले आहेत. या हल्ल्यात पीडित तरुणी जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

प्रियकराने लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणीला अशाप्रकारे मारहाण केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी तौफीक विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खूनाच्या प्रयत्नासह इतर कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. प्रेयसी तरुणीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीवर प्रियकरानेच अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास सोलापूर एमआयडीसी पोलीस करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group