सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री  ! गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ , 'उज्वला'  सिलेंडरलाही  दरवाढ
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ , 'उज्वला' सिलेंडरलाही दरवाढ
img
दैनिक भ्रमर
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असून आता नव्या अर्थिक वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात महागाईचा धक्का बसला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्य कुटुंबांना मोठा धक्का दिला आहे. उद्यापासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहे.

 2014 पासून गॅस सिलेंडर अडीचपट महाग झाले आहेत. उज्वला योजनेतील सिलिंडरच्याही दरात वाढ करण्यात आली आहे. उज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील दरवाढ लागू होणार आहे.

सिलेंडर दर वाढीच्या या निर्णयामुळे सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सध्या सिलेंडर 500 रुपयाला मिळत असून त्याचा दर 550 रुपये होणार आहे. तर मुंबईत सध्या गॅस सिलेंडर 810 रुपयांना मिळत असून त्याची किंमत 860  रुपयांना मिळणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group