गर्भवती महिला मृत्यूप्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं धोरणात काय बदल केला?
गर्भवती महिला मृत्यूप्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं धोरणात काय बदल केला?
img
दैनिक भ्रमर

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलं आहे. ही महिला भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होती. तनिषा भिसे असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान , पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं धोरणात काय बदल केलेत हे समोर आले आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेत रुग्णालयात या प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई केली आहे, याबाबत माहिती दिली आहे. तसेच डॉ. कैसास यांच्या राजीनाम्यावरही त्यांनी रुग्णालयाची भूमिका सांगितली आहे.

महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या डॉ. सुश्रुत घैसास हे आमच्याकचे मानद प्रसुती व स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. ते आमच्या रुग्णालयाचे कर्मचारी नाहीयेत. गेली दहा वर्षांपासून ते आमच्याकडे काम करतात. त्यांनी आज आमच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. गेल्या काही दिवसांतील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत, असे त्यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे. धमक्यांचे फोन, समाजमाध्यमांवर होणारी कठोर टीका तसेच तणावाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत त्यांच्या आताच्या रुग्णांच्या उपचारावर परिणाम होईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा, कुटुंबाच्या सुरक्षेच्या तसेच हिताच्या दृष्टीने त्यांनी राजीनामा दिला आहे.

रुग्णालय प्रशासन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार
तसेच,  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनामत रक्कम घेण्याची पद्धत कधीच नव्हती. खोट्या रकमांसाठी म्हणजेच 5 ते 10 रुपयांच्या खर्चासाठी ही पद्धत होती. ती आपण काढून टाकली आहे. आमच्या रुग्णालयच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. त्यामुळे काम करताना बोलण्या-वागण्यामध्ये संवेदनशीलता पाहिजे, माधुर्य पाहिजे ती कधी-कधी कमी होते. ती सुधारण्यासाठी आम्ही प्रशिक्षण चालू केले आहे, अशी माहितीही डॉ. केळकर यांनी दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group