धनंजय मुंडेंना मोठा धक्का !  न्यायालयाने  दिला ''हा'' निर्णय
धनंजय मुंडेंना मोठा धक्का ! न्यायालयाने दिला ''हा'' निर्णय
img
दैनिक भ्रमर
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंढे याना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले तसेच त्यांच्यावर टीकाही झाली आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता  धनंजय मुंढे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. धनंजय मुंडे यांना आणखी धक्का मिळाला आहे.  

करुणा शर्माना मोठा दिलासा मिळाला असून पोटगी कायम ठेवण्याचा निर्णय माझगाव कोर्टाने दिला आहे. मंत्री धनंजय मुंडेंची याचिका कुटुंब न्यायालयाने फेटाळली आहे. करुणा मुंडेंना दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली.

धनंजय मुंडे यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका देखील केली होती. यामध्ये आतापर्यंत चार सुनावणी पार पडल्या, आज अंतिम सुनावणी पार पडली त्यानंतर ही याचिका फेटाळण्यात आली आहे. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर हा निर्णय देण्यात आला आहे. करुणा मुंडे यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे धनंजय मुंडेंची याचिका फेटाळण्यात आली आहे.

करूणा मुंडेंना दोन लाखाची पोटगी देण्याचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला आहे. धनंजय मुंडेंचं स्वीकृतीपत्र आणि इच्छापत्र करूणा मुंडेंकडून कोर्टात सादर करण्यात आलं होते. तर करुणा मुंडे यांनी कोर्टात सादर केलेली कागदपत्र खोटी असल्याचा दावा धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला आहे.

सुनावणीनंतर बोलताना करुणा मुंडे याना अश्रू अनावर झाले. माझे जीवन रस्त्यावर आणलं गेलंय. मी गाडी घेऊन आले, त्यावरून हंगामा केला. मला रस्त्यावर आणि मीडियासमोर आणणारा धनजय मुंडे आहे. मला हिरॉईनची ऑफर होती पण मी पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला धंनजय मुंडे 20 करोड रुपये देणार होते, असा खुलासा करुणा मुंडे यांनी केला आहे.

वसियतनामा स्वीकृती यावर ज्या सह्या आहे, अंगठा निशाणा आहे तो धनजय मुंडे यांचाच आहे. यावर राज घनवट यांची देखील सही आहे. होम लोनमध्ये धनंजय मुंडे गॅरेंटर आहे. पण धनंजय मुंडे यांना प्रकरण दाबायचे होते. मी पहिली बायको आहे. जे मिळेल ते मिळेल त्याच्याशी काहीही सबंध नाही. पण मी पहिली बायको आहे, हे मला सिद्ध करायचं आहे. माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे मी ते मीडियाला देणार आहे, असं करुणा मुंडे म्हणाल्या
इतर बातम्या
Join Whatsapp Group