रेल्वेचे ''हे'' 4 नियम पाळा नाहीतर गमावू शकता कन्फर्म सीट ! वाचा सविस्तर
रेल्वेचे ''हे'' 4 नियम पाळा नाहीतर गमावू शकता कन्फर्म सीट ! वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
रेल्वे ने प्रवास करणाऱ्या एक मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे. विशेतः जर तुम्ही सीट आरक्षित करून प्रवास करत असला तर तुम्हाला या 4 नियमांचं पालन करावे लागणार आहे. 

रेल्वे प्रवासात अनेक प्रवासी ट्रेनमध्ये आरक्षण करून प्रवास करतात. आरक्षणामुळे कन्फर्म सीट मिळते, पण यासाठी काही नियम आहेत, जे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांवर लागू होतात. ट्रेनमध्ये एसी आणि स्लीपर कोचमध्ये सीट मिळवता येते, परंतु जर प्रवासी वेळेवर त्याच्या सीटवर बसू शकला नाही, तर त्यांना ती सीट गमावण्याची शक्यता असते.

 आवश्यक असलेले नियम

1. निर्धारित वेळेत सीटवर बसावे
जर प्रवासी आपल्या निश्चित स्टेशनवर आपल्या सीटवर बसू शकत नाहीत, तर त्यांना एक निश्चित वेळ दिली जाते. या वेळेत बसल्यास सीट राखीव ठेवली जाते.

2. ‘टू-स्टॉप नियम’
जर प्रवासी निर्धारित स्टेशनवर बसू शकत नसतील, तर त्यांना पुढील दोन स्टॉप्सपर्यंत सीट राखून ठेवता येते. याला ‘टू-स्टॉप नियम’ म्हणतात. म्हणजेच, पुढील दोन स्टॉप्सपर्यंत आरक्षित सीट उपलब्ध राहते.

3. टीटीईच्या हस्तक्षेपाची शक्यता
जर प्रवासी दोन स्टॉप्स आणि त्यानंतरच्या दोन स्टॉप्सनंतरही सीटवर बसू शकत नाहीत, तर टीटीई त्याच्या कन्फर्म सीटला अनरिजर्व्ड म्हणून चिन्हांकित करून दुसऱ्या प्रवाशाला देऊ शकतो.

4. टीटीई कडून योग्य कारवाई
जर प्रवासी आरक्षित सीटवर बसण्यास अपयशी ठरतात, तर टीटीई संबंधित प्रवाशाच्या सीटला अनरिजर्व्ड म्हणून घोषित करु शकतो आणि त्या सीटवर दुसऱ्या प्रवाशाला बसवू शकतो.

हे नियम लक्षात ठेवून प्रवाशांना त्यांची सीट सुरक्षित ठेवता येईल आणि ट्रॅव्हलिंगच्या अनुभवात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. कन्फर्म सीटवर बसण्यासाठी योग्य वेळेत पोहोचणे महत्त्वाचे आहे, अन्यथा सीट गमावण्याची स्थिती उद्भवू शकते
इतर बातम्या
Join Whatsapp Group