पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलं आहे. ही महिला भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होती. दरम्यान , पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहे. दरम्यान आता हे प्रकरण चिघळले असून भाजपही आक्रमक झाली आहे.
ज्या डॉक्टरांनी 20 लाखांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्या डॉक्टरांचं खासगी क्लिनिक फोडण्यात आलंय. डॉक्टर सुकृत घैसास असं डॉक्टरांचं नाव आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून क्लिनिकची तोडफोड करण्यात आलीय.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी ज्या डॉक्टरांनी वीस लाखांची मागणी केली त्या डॉक्टरांचे खाजगी क्लिनिक भाजप महिला आघाडीने फोडलं. डॉक्टर सुकृत घैसास यांचं रुग्णालयाच्या पाठीमागेच खाजगी क्लिनिक आहे. खाजगी क्लिनिकची महिला पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे.