वाह ! पंढरपुरात स्वच्छतेचं काम करणाऱ्या महिलेला  21 लाखांची लॉटरी लागली
वाह ! पंढरपुरात स्वच्छतेचं काम करणाऱ्या महिलेला 21 लाखांची लॉटरी लागली
img
दैनिक भ्रमर
एका स्वच्छता कामगार महिलेला चक्क 21 लाखांची लॉटरी लागली असल्याची बातमी समोर आली आहे. राब राब राबणाऱ्या या महिलेला जणू विठ्ठलच पावला अशी आनंदायी  घटना या महिलेच्या आयुष्यात घडली आहे. 

पिढ्यानपिढ्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या पंढरपुरातील एका गरीब महिलेला चक्क 21 लाखांची लॉटरी लागली आहे. साक्षात पांडुरंगच पावला अशी भावना मनिषा वाघेला यांनी व्यक्त केली आहे.  मनीषा वाघेला या देखील शहरातील अनेक लोकांच्या शौचालयांच्या स्वच्छतेचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत असतात.

मनीषा वाघेला यांचे पंढरपुरातील मेहतर गल्लीमध्ये ‘दहा बाय दहा’चे पत्र्याचे घर आहे. अलीकडेच त्या पंढरपुरातील चौफाळा येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या‌.यावेळी त्यांनी सहज म्हणून शेजारीच असलेल्या लॉटरी विक्री केंद्रातून पन्नास रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. हे तिकीट काढून त्या विसरुन देखील गेल्या होत्या.

परंतू त्यांनी वृत्तपत्रात आपण खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकीटाचा नंबर सहज चेक केला तर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ध्यानीमनी नसताना त्यांना 21 लाख रुपयांचं बक्षिस लागल्याचे कळाल्याने त्यांना सुखद धक्काच बसला. २१ लाखांची लॉटरी लागल्याचे कळताच पांडुरंग पावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्या या बक्षिसाच्या मिळालेल्या पैशातून एक छोटेसे घर खरेदी करायचे आहे. आपण आपल्या मुलांना हे काम करावे लागू नये म्हणून चांगले शिक्षण देणार असा मनोदय मनीषा वाघेला यांनी व्यक्त केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group