रुग्णालयातील संतापजनक प्रकार  ! प्रसूत महिलेने रुम झाडला, नवऱ्याने टॉयलेट साफ केल
रुग्णालयातील संतापजनक प्रकार ! प्रसूत महिलेने रुम झाडला, नवऱ्याने टॉयलेट साफ केल
img
दैनिक भ्रमर
एका प्रसूत महिलेवर रूम झाडण्याची वेळ असून तिच्या पतीने टॉयलेट साफ केला असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. 
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथून हा  गंभीर प्रकार समोर आला आहे. येथे प्रसूत झालेल्या एका महिलेला तिची रुम साफ करायची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या पतीने एकूण सात दिवस स्वच्छतागृह साफ केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार घडलेला प्रकार हा माढा ग्रामीण रुग्णालयात घडला आहे. या रुग्णालयात माढा तालुक्यातील खैराव गावाच्या हेमा शैलेश धडे यांचा प्रसूत झाल्या होत्या. या रुग्णालयात त्या एकूण सात दिवस होत्या. या सातही दिवस त्यांच्यावर स्वत: रुम साफ करण्याची वेळ आली आहे. तर त्यांच्या पतीनेच रुममधील टॉटलेट साफ केले आहे. हेमा शैलेश धडे यांच्या कुटंबींयांनीच हा विदारक अनुभव सांगितला आहे. हेमा धडे यांचे सिझर झाले होते. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पोटाला टाके घालण्यात आले होते. त्यांना प्रचंड त्रास होत असतानाही त्यांना त्यांच्या रुमची साफसफाई करावी लागली. रुमची स्वच्छता करण्यासाठी कर्मचारीच न आल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

दरम्यान, हा विदारक अनुभव आल्यानंतर माढा ग्रामीण रुग्णालयाच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारलाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी शंभू साठे यांनी केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group