तुळजापूरमधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ड्रग्स तस्कर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असून ड्रग्स तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराचे पुजारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुख्यआरोपी पूजा गोळे, सूत्रधारासह 35 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात 16 पुजारी गुन्ह्यात समाविष्ट असल्याची माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुख्य आरोपी आणि दक्ष पुरवठा करणाऱ्या एजंटमार्फत ड्रग्सचा पुरवठा होत होता. यात पुजारी ही ड्रग्स तस्करी प्रकरणात पोलिसांनी संशयित असून चौकशी करून गुन्हे दाखल केले आहेत.
तुळजापूर ड्रग्स प्रकरणात तुळजाभवानी मंदिर पुजाऱ्यांचे नाव आल्याने आता मंदिर बंदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर पुजारी व मंदिर प्रशासनात वाद निर्माण झाला आहे. ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 16 पुजाऱ्यावर गुन्हे दाखल तर अनेकांना चौकशीसाठी पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पुजारी ही आक्रमक झाले आहेत. देऊळ कवायत कायदा पुजाऱ्यावर कार्यवाहीसाठी नाही कायद्याचा आधार घेऊन पुजाऱ्यावर दंडमशाही थांबवा, असा हल्लाबोल पुजाऱ्यांनी प्रशासनावर केला आहे.