हृदयद्रावक ! बाप-लेकीला ट्रकने चिरडलं, आईच्या डोळ्यादेखत लेक आणि पतीचा  मृत्यू
हृदयद्रावक ! बाप-लेकीला ट्रकने चिरडलं, आईच्या डोळ्यादेखत लेक आणि पतीचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर
गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. दरदिवशी अनेक भयानक आणि भीषण घटना घडत आहेत. दरम्यान अशाच एका अपघाताची बातमी समोर आली आहे. 

वाशिममध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. नागपूर- छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात स्कुटीवरून जाणाऱ्या बाप-लेकीला अज्ञात ट्रकने चिरडलं. या अपघातात बाप लेकीची जागेवरच मृत्यू झाला आहे. तर आई गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या नागपूर ते छत्रपती संभाजीनगर या द्रुतगती महामार्गावरील मुरंबी फाट्याजवळ ही घटना घडली. धाकली किनखेड येथील अंबादास जावळे हे त्यांची पत्नी उषा जावळे आणि मुलगी आरती जावळे यांना सोबत घेऊन स्कुटीने कारंजावरून नागपूर - संभाजीनगर या द्रुतगती महामार्गाने त्यांच्या गावी धाकली किनखेड येथे जात होते. जावळे हे मुरंबी फाट्याजवळ पोहोचले असता अज्ञात ट्रकने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. ट्रकची धडक बसल्यानंतर तिघेही खाली पडले. 

दुर्दैवीने स्कुटी चालवणारे अंबादास जावळे ( वय 45 वर्षे ) आणि त्यांची मुलगी आरती जावळे( वय 10 वर्षे ) हे दोघे ट्रकच्या चाकाखाली सापडले. त्यामुळे घटनस्थळीच दोघे ठार झाले. तर त्यांची उषा जावळे या जखमी झाल्या आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहे. अपघातानंतर ट्रक पसार झाला आहे. अपघाताला जबाबदार असलेल्या ट्रकचालकाचा शोध कारंजा ग्रामीण पोलीस घेत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group