गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ड्रग्ज तस्करीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान, आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा गाव ८ एप्रिल रोजी अचानक चर्चेत आलं, ते एका धाडीमुळे. ही धाड केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा अर्थात DRI आणि अंमली पदार्थ नियंत्रक पथक अर्थात NCB च्या संयुक्त पथकाने. ज्यात ११ किलो ३६ ग्रॅम मेफो ड्रम हा अमली पदार्थ व कच्चा माल जप्त करण्यात आला. ज्याची मूळ किंमत १७ कोटींच्या घरात आहे.
केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा अर्थात DRI आणि अंमली पदार्थ नियंत्रक पथक अर्थात NCB च्या संयुक्त कारवाईत चाकूर तालुक्यातील रोहिना गावातून तब्बल १७ कोटींचे ड्रग्स जप्त केलं. विशेष बाब म्हणजे मुंबईत पोलीस कर्मचारी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचेच गाव असून यात त्याचाच हात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा यामुळे डागळली आहे.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा गाव ८ एप्रिल रोजी अचानक चर्चेत आलं, ते एका धाडीमुळे. ही धाड केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा अर्थात DRI आणि अंमली पदार्थ नियंत्रक पथक अर्थात NCB च्या संयुक्त पथकाने. ज्यात ११ किलो ३६ ग्रॅम मेफो ड्रम हा अमली पदार्थ व कच्चा माल जप्त करण्यात आला. ज्याची मूळ किंमत १७ कोटींच्या घरात आहे.
मुंबईच्या मीरा भाईंदर पोलिसात कार्यरत कर्मचारी असलेला प्रमोद संजय केंद्रे याचे मूळ गाव हे चाकूर तालुक्यातील रोहिणा गावचा आणि या केंद्रेच्या शेतात ड्रग्स बनविण्याचा कारखाना या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता. यात DRI आणि NCB च्या पथकाने एकूण ०७ जणांवर गुन्हा दाखल केला. ज्यात पोलीस कर्मचारी असलेला प्रमोद केंद्रे याच्यासहित मुंबई आणि परिसरातील ०६ आरोपीचा समावेश आहे.
मुळात ड्रग्सचा एवढा मोठा कारखाना चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असताना पोलिसांना याची खबर कशी लागली नाही? एलसीसीबी, डीबीसारख्या पोलिसांच्या यंत्रणा कुचकामी ठरल्याचे यामुळं अधोरेखित होत आहे. त्यामुळेच मुंबईच्या DRI आणि NCB च्या पथकाला चाकूर तालुक्यात रोहिना येथे येऊन कारवाई करावी लागली.
ड्रग्ज प्रकरणात कुणाकुणाला अटक?
याप्रकरणात पोलिस कर्मचारी असलेला प्रमोद केंद्रे, महमद कलीम शेख,गोळीबार रोड, मुंबई,जुबेर हसन मापकर (५२)रा.रोहा जि.रायगड, आहाद मेमन,मुंबई अहमद अस्लम खान रा.मुंबई, वसीम शहराद शेख ( वय ३४ ) रा . मिरा रोड ठाणे आणि दिलावर आल्तफ खान ( वय ३२ ) रा . सांताक्रूझ, मुंबई यांना चाकूर न्यायालयाने दिली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. आता या प्रकरणात आणखी कोणी आरोपी सापडतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.