इमर्जन्सी पेशंट कडून पैसे मागता येणार नाही, महापालिकेच्या निर्णयाला IMA चा विरोध
इमर्जन्सी पेशंट कडून पैसे मागता येणार नाही, महापालिकेच्या निर्णयाला IMA चा विरोध
img
दैनिक भ्रमर
पुण्यात गेल्या आठवड्यात एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न  मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून दीनानाथ मंगेशकर] रुग्णालयाला जबाबदार धरण्यात आले. पेशंट इमर्जन्सी  असूनही आधी पैसे भरण्याची मागली करण्यात आली असल्यामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळाले नाही असा आरोप रुग्णाच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता. या पप्रकरणावरून सर्वच स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान,  गर्भवती महिला तनिषा भिसे यांना तातडीने उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कठोर पावले उचलली आहेत. तातडीच्या रूग्णाकडून पैसे मागता येणार नाही, या नियमाची अंमलबजावणी करण्याची सक्ती महापालिकेने केली आहे. परंतु महापालिकेच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ॲाफ इंडियाकडून कडाडून दर्शविण्यात आला आहे.

तातडीच्या रुग्णांकडून पैसे घेऊ नयेत, ही महापालिकेची सक्ती गैरलागू आहेत. अनेक जण याचा गैरफायदा घेतील. महापलिकेने यावर विचार करावा, अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ॲाफ इंडियाने केली आहे.

रुग्णाची इमर्जन्सी नेमकी कशी ठरवायची? असा सवाल करीत इमर्जन्सीमध्ये कुठलाही डॉक्टर आधी पैसे मागत नाही. आधी पेशंटची ट्रीटमेंट करतो. महापालिकेच्या या निर्णयाचा अनेक जण गैरफायदा घेत आहेत. या नोटीसीचा देखील विपर्यास केला जात आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या कायद्याप्रमाणे इस्टिमेट देणे आणि ॲडव्हान्स घेणं हे कायदेशीर आहे. खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयाचे नियम हे वेगळे असतात. महापालिकेला देखील याबाबत आम्ही उत्तर देऊ, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.

तनिषा भिसे मृत्यूप्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना १० लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. तातडीचे उपचार करण्यासाठी १० लाख रुपये भरा, असे डॉ. घैसास यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितल्याचा आरोप भिसे कुटुंबाने केलाय. ज्यानंतर तातडीच्या परिस्थितीत रुग्णाकडून पैसे मागायचे की नाही, हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group