हेल्मेट सक्ती असून या नियमाचे पालन करणे सर्वांना अनिवार्य आहे. परंतु एका पोलिसाने हेल्मेट घातलेले नव्हते म्हणून हेल्मेट का नाही घातलं? असा प्रश्न करणाऱ्या तरुणाच्या पोलिसाने कानशिलातच लागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नागपूरमध्ये घडली आहे.
तरुणाने वाहतूक नियमांची आठवण करून दिली म्हणून पोलिसाने चक्क तरुणाच्या कानशिलात लगावली आहे. बाईक चालवताना हेल्मेट का घातलं नाही? असं या तरुणाने पोलिसांना विचारलं. त्यावर राग अनावर होऊन या पोलिसाने तरुणाला कानशिलात लगावली. इतकंच नाही तर या पोलिसाकडून तरुणाला शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, दात दुखत असल्याने हेल्मेट घातलं नसल्याचं या पोलीसाचं म्हणण आहे. हा संपूर्ण प्रकार नागपूरमध्ये घडला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.