धनंजय मुंडेंचं इच्छापत्र करुणा शर्मांनी न्यायालयासमोर  केले सादर ! नेमकं काय आहे ?  वाचा सविस्तर
धनंजय मुंडेंचं इच्छापत्र करुणा शर्मांनी न्यायालयासमोर केले सादर ! नेमकं काय आहे ? वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
राज्यातील घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना न्यायायलायाकडून मोठा दणका मिळाला आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेली आव्हान याचिका  माझगाव सत्र न्यायालयाने  फेटाळून लावली आहे.वांद्रे न्यायालयाने करुणा मुंडे यांना दर महिन्याला २ लाख रुपये पोटगी द्यावी, असे आदेश धनंजय मुंडेंना दिले होते. तेच निर्देश माझगाव कोर्टाने कायम ठेवले आहेत.दरम्यान,  आता आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ,  झालेल्या अंतिम सुनावणीवेळी करुणा मुंडेंकडून महत्वाची कागदपत्रे पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे धनंजय मुंडेंचे अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र पुरावा म्हणून करुणा मुंडे यांनी न्यायालयासमोर सादर केले.

करुणा मुंडे यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडे यांच्या इच्छापत्रानुसार, माझ्या दोन्ही बायकांपासून झालेली मुलं आणि मुली माझ्या वारसदार असतील. माझ्या संपत्तीच्या वारसदार करुणा शर्मा यांच्यापासून झालेली दोन मुलं आणि राजश्री मुंडे यांच्यापासून झालेल्या तीन मुली असतील. माझ्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा वाटा माझ्या मुलांना आणि मुलींना देत आहे, असे त्यांच्या इच्छापत्रात नमूद करण्यात आले आहे.

धनंजय मुंडे यांनी इच्छापत्रात करुणा मुंडे याच माझ्या पहिल्या पत्नी आहेत, असे लिहून दिले आहे. आई वडिलांच्या जबरदस्तीमुळे मला दुसरे लग्न करावे लागले असे सांगत राजश्री यांच्याबरोबर लग्न केल्याचे धनंजय मुंडे यांनी इच्छापत्रात म्हटले आहे. ०९ जानेवारी १९९८ रोजी वैदिक विधीनुसार करुणा अशोक शर्मा यांच्याशी एका मंदिरात लग्न केले आहे आणि माझ्याकडे त्याचे फोटो आहेत. जे मी वेळ आल्यावर करुपा मुंडेंना देईन. माझ्या पालकांच्या दबावाखाली मी पुन्हा लग्न केले पण मी करुणाला घटस्फोट देणार नाही आणि नेहमीच माझ्या मुलांसोबत राहीन, असे धनंजय मुंडे यांनी इच्छापत्रात नमूद केले आहे.

जर माझ्या नावावर कोणतेही पेन्शन मिळाले तर दोन्ही वारसदारांना त्याचे समान हक्क असतील. माझ्या मृत्यूनंतर, माझे अंतिम संस्कार आणि अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार फक्त माझा मुलगा श्रीशिव मुंडे यांचा असेल. ही माझी शेवटची इच्छा आहे. इतर कोणताही वारस यामध्ये कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही. जर कोणी आक्षेप घेतला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असेही धनंजय मुंडे यांनी इच्छापत्रात म्हटले आहे.

जर माझ्या नावावर कोणतेही पेन्शन मिळाले तर दोन्ही वारसदारांना त्याचे समान हक्क असतील, असेही धनंजय मुंडे यांच्या इच्छापत्रात नमूद करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group