एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे . शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरी कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघात ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला. या अपघातात दोन महिलांसह एका पुरुषाचा जीव वाचला आहे. पण या दोन महिलांना ज्या व्यक्तीने वाचवलं, त्याच व्यक्तीची पत्नी अद्याप सापडली नाही. पुरभाजी सरोदे असं या व्यक्तीचं नाव असून त्यांनी दोन महिलांचा जीव वाचवला आहे.
प्रत्यक्षदर्शी पुरभाजी सरोदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, मी दोन महिलांना बाहेर काढलं. मात्र माझ्या स्वतःच्या पत्नीचा विहिरीत बडून मृत्यू झाला. मी दोन महिलांना वाचवलं. मात्र माझी पत्नी विहिरीत आहे. सकाळी मी गावाकडून आलो होतो. मी पत्नीच्या आधी आलो होतो, ट्रॅक्टर पाठीमागून आला. मी वर होतो. आरडाओरडा झाल्यानंतर मी विहिरीजवळ आलो.
तेव्हा विहिरीमध्ये सगळे 11 लोक होते. विहिरीमध्ये सगळ्या सात महिला आहेत, त्यात माझी पत्नी सुद्धा आहे. माझी पत्नी मला दिसली नाही. ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्या पाण्यात बुडाल्या. मी दगडू शिंदे यांच्या शेतात कामाला आलो होतो. हा ट्रॅक्टर मालकाचा होता. अपघात झाल्यानंतर मी घटनास्थळी यायच्या आधी ड्रायव्हर पळून गेला, असंही पुरभाजी सरोदे यांनी सांगितलं.