अवकाळी नंतर आता राज्यात उष्णतेची लाट येणार ! हवामान विभागाचा अलर्ट
अवकाळी नंतर आता राज्यात उष्णतेची लाट येणार ! हवामान विभागाचा अलर्ट
img
दैनिक भ्रमर
राज्यातील वातावरनामध्ये कमालीचे बदल होत असून मागील काही दिवसांमध्ये राज्यावर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. 

भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईसह कोकणातील काही भागांत सूर्य आग ओकणार असून, नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात 9 एप्रिल रोजी हवामान पुन्हा एकदा तीव्र उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईसह कोकणातील काही भागांत सूर्य आग ओकणार असून, नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण होऊ शकते, त्यामुळे पाणी पिणे आणि सावलीत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईसह कोकणातील काही भागांत सूर्य आग ओकणार असून, नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण होऊ शकते, त्यामुळे पाणी पिणे आणि सावलीत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबईत 9 एप्रिल रोजी कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे तर किमान तापमान 28 अंशांपर्यंत राहील. आर्द्रतेमुळे उकाडा जाणवेल आणि ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात कमाल तापमान 38 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून रात्री थोडीशी थंडी जाणवेल तर किमान तापमान 22 अंशांपर्यंत खाली येईल.
पुण्यात कमाल तापमान 38 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून रात्री थोडीशी थंडी जाणवेल तर किमान तापमान 22 अंशांपर्यंत खाली येईल.

नागपूर आणि विदर्भातील इतर शहरांमध्ये उष्णतेची लाट तीव्र असेल, जिथे तापमान 41 ते 43 अंशांपर्यंत जाऊ शकते. यामुळे या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्ये तापमान 39 अंशांपर्यंत राहील तर कोल्हापुरात 37 अंशांपर्यंत उष्णता जाणवेल. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात तुलनेने कमी उष्णता असेल पण तरीही तापमान 35 ते 36 अंशांपर्यंत राहील. 

हवामान विभागाने विदर्भात 9 आणि 10 एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर पश्चिम महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे तसेच लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेपासून बचावासाठी हलके कपडे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group