पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलं आहे. ही महिला भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होती. तनिषा भिसे असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणा नंतर पुणे महानगरपालिकेला खडबडून जग आली आहे. महानगरपालिकेनं शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारासंदर्भात नोटीस पाठवली आहे.
तातडीच्या उपचारांची गरज असल्यास रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नयेत अशा नोटीसा पालिकेनं सर्व रुग्णालयांना बजावल्या आहेत. तसेच तातडीच्या उपचारांसाठी अनामत रक्कम घेऊ नका, अशी नोटीस देखील महापालिकेकडून तब्बल 850 खासगी रुग्णालयांना देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारांसंदर्भात नोटीस पाठविली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये. रुग्णावर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावे, असे महापालिकेने रुग्णालयांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणारे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील 850 रुग्णालयांना नोटिस पाठविण्यात आली आहे.इमर्जन्सी केसमध्ये संबधित रुग्णांच्या कुटुंबियांकडून डिपॉझिट घेऊ नये, उपचार दिल्यानंतर इतर गोष्टींबाबत कुटुंबियासोबत चर्चा करा,रुग्णालयात आलेल्या रुग्णांना प्राधान्याने उपचार दिले पाहिजे.जर कोणत्याही रुग्णालयाने डिपॉझिट ची मागणी केल्यास त्या रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पुणे महानगरपालिकेने आरोग्य समितीने धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहिलंय
गर्भवती महिलेला मंगेशकर रुग्णालयातून उपचारापूर्वी 10 लाख रूपये भरण्याच्या मुद्द्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करावी असं पत्र लिहिलंय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या समितीकडून चौकशी सुरू आहे. धर्मादाय सहआयुक्तांसह एकूण पाच सदस्य समिती चौकशी करणार आहे. धर्मादाय आयुक्त समितीचा अहवाल येण्यासाठी दोन दिवस लागणार आहे. डॉक्टरांनी पैसे मागितले होते का? त्या साडे पाच तासात रुग्णालयात नेमकं काय घडलं, वैद्यकीय हलगर्जीपणा आहे का या तीन मुद्द्यांवर ही समिती अहवाल देणार आहे.