श्री भगवती दर्शन सुरळीत सुरू असून, कोणतीही दुर्घटना झालेली नाही, पर्यायी भाविकांनी कोणत्याही अफवा व गैरसमजुतीला बळी पडू नका असे आवाहन विश्वस्त ऍड ललित निकम यांनी केले आहे.
आदिशक्ती श्री सप्तशृंग मातेचा ते म्हणाले, चैत्रौत्सव - २०२५ सुरू असून, लाखोंच्या संख्येने भाविक भक्त श्री भगवतीच्या दर्शनाला पायी दिंडी व पालखी माध्यमातून गडावर येत आहेत. आज गडावर अचानकपणे गर्दी झाल्याने बॅरिकेटिंग फिटिंग करतांना भाविकांच्या गर्दीचा अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ काढून त्याच्या माध्यमातून चेंगराचेंगरी झाल्याची चुकीचं वृत्त प्रक्षेपित झाले होते.
या वृत्त बाबत जिल्हा प्रशासनाने दखल घेत संपूर्ण परिसराला क्षेत्रभेट परिस्थितीचे अवलोकन केले असून सदर वृत्त हे गैरसमज व चुकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पर्यायी भाविकांनी चेंगराचेंगरी झाल्याच्या कोणत्याही अफवा व गैरसमजुतीवर विश्वस्त ठेवू नये, असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.