राजकीय ! हर्षवर्धन पाटील पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? वाचा सविस्तर
राजकीय ! हर्षवर्धन पाटील पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
राज्यातील राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील पक्षांना गळती लागली आहे. दरम्यान अशा अनेक घडामोडीही घडली आहेत. दरम्यान आता एक मोठी माहिती समोर येत आहे. 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सगळ्यात जास्त चर्चा होत आहे. कारण ते वारंवार भाजप नेत्यांच्या भेटीसाठी घेत आहेत. मागील आठवड्यात त्यांनी इंदापूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदरातिथ्य केले तर आज त्यांनी महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर मला आता शांत झोप लागत आहे. कोणतीही चौकशी नाही, काही नाही. त्यामुळे आनंदात आहे, असे विधान काही वर्षांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. आता पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या शांत झोपेची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घेतलेली भेट.

हर्षवर्धन पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र मागील काही दिवसापासून त्यांच्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यात. मात्र आजची भेट त्यांनी मतदारसंघातील कामासाठी घेतली असल्याचे माध्यमांना सांगितले आहे. इंदापूर मतदारसंघातील एक महसूलसंबंधी विषय होता. त्यामुळे मंत्री बावनकुळे यांची भेट घेण्याचे क्रमप्राप्त होते, असे सांगत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान या भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, त्यांनीही आजची भेट त्यांच्या मतदारसंघातील कामनिमित्त असल्याचे म्हणत हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेण्याचा प्रश्न येत नसल्याचे म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group