
५ एप्रिल २०२५
शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली. आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या तोडांवर या दोन्ही नेत्यांनी भेट घेतली, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान भेट झाल्यानंतर उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भेटीमागचं कारण सांगितलं आहे. उदय सामंत म्हणाले, "मराठी माणसांच्या संदर्भात ज्या घडामोडी चालू आहेत, त्यासंदर्भात राज ठाकरेंनी मला भेटायला बोलावलं होतं.
इथे येण्यापूर्वी मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊन आलो आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्या काही संस्था आहेत, बँका आहेत, त्यात मराठीच्या बाबतीत निर्णय घेतला जातो. किंवा त्या ठिकाणी ज्या गोष्टी घडतात, त्याचा प्रतिबंध कसे करायचे, त्यासंदर्भात राज ठाकरेंनी काही सुचना दिल्या.
यासंदर्भात मी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. त्यात काही सुधारणा करता येतील, त्या दृष्टीने निर्णय घेऊ", असं उदय सामंत म्हणालेत.
Copyright ©2025 Bhramar