मोठी बातमी !  भाजपच्या ''या'' बड्या नेत्याकडून निवृत्तीचे संकेत
मोठी बातमी ! भाजपच्या ''या'' बड्या नेत्याकडून निवृत्तीचे संकेत
img
दैनिक भ्रमर
 राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून विधासभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन केले आहे. दरम्यान राजक्रांतील घडामोडींना वेग आला असून आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आपल्या वाढदिवशीच भाजपच्या बड्या नेत्याकडून आपल्या निवृत्तीचे संकेत देण्यात आले आहेत. माजी मंत्री आणि भाजपचे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी यापूढे आपण  विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे.

बबनराव लोणीकर यांचा आज वाढदिवस आहे, आणि त्यांनी आपल्या वाढदिवशीच मोठी घोषणा केली आहे. यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ‘माझं वय आता 60 वर्षे झालेलं आहे, त्यामुळे मी आता रिटायरमेंटच्या दिशेनं आहे. त्यामुळे यापुढे विधानसभा लढायची नाही असं म्हणत माजी मंत्री आणि परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून निवृत्तीची घोषणा केली आहे.मात्र दुसरीकडे साधू संतांच्या आशीर्वादाने आणि पक्षाने जर संधी दिली तर लोकसभा निवडणूक एकदा लढवण्याची इच्छा आहे. असं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले आहेत. दरम्यान , लोणीकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group