राज्यातील घडामोडींना वेग आला असून राज्याचा अर्थसंकल्प २०२५ मांडताना अर्थ मंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान, त्यांनी 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार अशी घोषणा केली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार अशी घोषणा अर्थ मंत्री अजितदादा यांनी आज अधिवेशनात केली आहे, राज्याचा अर्थसंकल्प २०२५ मांडताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले महाराष्ट्रात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहोत. त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळवून दिला आहे असे अजितदादा यावेळी म्हणाले.
अशा शब्दात अर्थमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेचा गौरव करीत मायमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मांडले. आपल्या मायमराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 3 ऑक्टोबर, 2024 रोजी झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाषिकांच्यावतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो असेही अजितदादा पवार यावेळी म्हणाले.
यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान टअभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरु करण्यात येणार आहेत अशीही माहीती यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.