रोहित शर्मा याची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती ! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
रोहित शर्मा याची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती ! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
img
दैनिक भ्रमर
क्रिकेट विश्वातून एक  मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार आणि फलंदाज रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. रोहित शर्मा याने टी 20नंतर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्मा याने सोशल मीडियावरुन इंस्टा स्टोरी पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. रोहितने एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. रोहितने निवृत्ती जाहीर करण्याआधी त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याची चर्चा सुरु होती. 

दरम्यान , “रोहित शर्माने इंस्टा स्टोरीत त्याच्या 280 क्रमांकाच्या टोपीचा फोटो पोस्ट केला आहे. मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. भारतीय संघाचं कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी तुमच्या प्रेमासाठी आणि पाठींब्यासाठी आभारी आहे”, असं रोहितने या इंस्टा स्टोरीत नमूद केलंय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group