एअर स्ट्राइकवर राज ठाकरेंनी  दिली ''ही'' प्रतिक्रिया, पंतप्रधानांवर टीका, नेमकं काय म्हणाले ?
एअर स्ट्राइकवर राज ठाकरेंनी दिली ''ही'' प्रतिक्रिया, पंतप्रधानांवर टीका, नेमकं काय म्हणाले ?
img
दैनिक भ्रमर
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आता एक्शन मोड मध्ये आले असून भारताकडून  पाकिस्तानातील एअर स्ट्राइक करण्यात आला आहे. या स्ट्राइकनंतर अनेक स्तरारून विविध प्रतिक्रया व्यक्त केल्या जात असून यावर समाधान व्यक्त केलं जातंय. दरम्यान आता यावर राज ठाकरे यांनी दखल एक प्रतिक्रया दिली आहे. 

“पहलगामला जो हल्ला झाला, मी त्याच्यावर पहिलं टि्वट केलेलं. ज्यांनी हल्ला केलाय, त्या अतिरेक्यांना, दहशतवाद्यांना कठोरात कठोर पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिलं असा धडा शिकवला पाहिजे. दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही” अशी पाकिस्तानातील एअर स्ट्राइकनंतर राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला म्हणून त्यांनी युद्ध केलं नाही. त्यांनी अतिरेकी ठार मारले” असं राज ठाकरे म्हणाले. 

“दुसऱ्यादेशामध्ये युद्ध परिस्थिती आणायचीय. आता मॉक ड्रील करायचं, सायरन वाजवायचे. मूळात ही गोष्ट का घडली? याचा अंतमूर्ख होऊन आपण विचार करणं गरजेच आहे. मूळात पाकिस्ताना हा आधीच बरबाद झालेला देश आहे” असं राज ठाकरे म्हणाले.

“ज्या अतिरेक्यांनी तुमच्यावर हल्ला केला, ते अतिरेकी अजून सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक जिथे जातात तिथे सुरक्षा का नव्हती?. मॉकड्रीलपेक्षा पण कोम्बिंग ऑपरेशन करणं जास्त गरजेच आहे. एअर स्ट्राइक करुन लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकटवण यावर युद्ध हे उत्तर होऊ शकत नाही” असं राज ठाकरे म्हणाले.

“सरकारच्या चूका तुम्हाला दाखवल्या पाहिजेत. ज्यावेळी हे सर्व झालं, त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियात होते. तो दौरा सोडून ते आले. बिहारला प्रचारासाठी गेले, ती गोष्ट करायची गरज नव्हती. केरळला अदानींच्या पोर्टच्या उद्घाटनासाठी गेले. मुंबईत वेव्हच्या समीटला आले. इतकी गंभीर परिस्थिती होती, तर या गोष्टी टाळता आल्या असत्या” असं पीएम मोदी म्हणाले. “मॉकड्रील करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा, जे दहशतवादी आहेत, त्यांना हुडकून काढा” असं राज ठाकरे म्हणाले. ‘आज नाक्या- नाक्यावर ड्रग्स मिळतायत, त्याच्या खोलात जाण्याची गरज आहे’ असं राज ठाकरे म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group