माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कारचा अपघात
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कारचा अपघात
img
दैनिक भ्रमर
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दानवे यांच्या कारचा लोणावळा येथे अपघात झाला आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगात त्यांच्या कारला धडकला अशी माहिती समोर येत आहे.

हा अपघात लोणावळ्यातील जयचंद चौकात घडला. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. यानंतर या दुचाकीस्वार आणि दानवे यांच्यात काही काळ वादही झाल्याचे सांगण्यात येते. वाद वाढत असल्याचे पाहताच स्थानिकांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळला.
एका रिक्षाचालकाच्या मदतीने रावसाहेब दानवे आपल्या इच्छित स्थळी गेले.

ज्यावेळी वाद सुरू होता तेव्हा काही स्थानिकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हे मंत्री आहेत तेव्हा वाद शांत झाला. स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालकाने मध्यस्थी करत हा वाद मिटवला. तसेच हा वाद जास्त वाढू नये अशी समंजसपणाची भूमिका माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group