गोंदिया जिल्ह्यातुन एक दुरदैची घटना समोर आली आहे. मित्रांसोबत पोहायला गेलेला मुलगा घरी परतलाच नाही. डोहाच्या पाण्यामध्ये बुडून या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंश बारेवार (15) असे मृतक मुलाचे नाव आहे. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील हलबीटोला येथील ही घटना आहे.मृतक अंश हा काल दुपारी आपल्या मित्रासोबत हलबीटोला शमशानघाट परिसरात असलेल्या डोहात पोहायला गेला होता. याच पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंशच्या घरच्या लोकांनी अंश बेपत्ता असल्याची तक्रार गोरेगाव पोलिसात काल रात्री दिली होती.
पोलिसांनी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांना विचारपूस केल्यानंतर सदर प्रकार पुढे आला. आज दिनांक 22 एप्रिल रोजी मंगळवारी हलबीटोला शमशान घाट येथील खोल पाण्यातून अंशचे प्रेत गोताखोराच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसांनी घेतली आहे.