राज्यातील घडामोडींना वेग आला असून अनेक मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोपांची खेळी ही राजकीय वर्तुळात सुरूच असते. दरम्यान आता अशीच एक बातमी समोर आली आहे. अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यासाठी शासन आणि प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. रायगडवरून २० किमी अंतरावर असलेल्या सुतारवाडीत गृहमंत्री शाह हेलिकॉप्टरने गेले. शाह यांच्यासाठी सुतारवाडीत बनविलेल्या ४ हेलिपॅडसाठी शासनाने १ कोटी ३९ लाखां चा खर्च लागला असलायची माहिती आहे यावरून अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी रायगड दौऱ्यावर आलेले देशाचे गृहमंत्री अमित शाह हे खासदार सुनील तटकरे यांच्या आग्रहाखातर त्यांच्या सुतारवाडीतील घरी स्नेहभोजनासाठी गेले. रायगडावरून थेट सुतारवाडीत ते हेलिकॉप्टरने गेले. सुतारवाडीत हेलिपॅड करण्यासाठी जवळपास १ कोटी ३९ लाखांचा खर्च आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तटकरेंच्या आग्रहाखातर आणि शाहांच्या जेवणासाठी सरकारी तिजोरीवर भार कशासाठी? असा प्रश्न विचारीत अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.
अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यासाठी शासन आणि प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. रायगडवरून २० किमी अंतरावर असलेल्या सुतारवाडीत गृहमंत्री शाह हेलिकॉप्टरने गेले. शाह यांच्यासाठी सुतारवाडीत बनविलेल्या ४ हेलिपॅडसाठी शासनाने १ कोटी ३९ लाखांचे कंत्राट (टेंडर) काढले होते. एका वर्तमान पत्रात वर्तमानपत्रात ९ एप्रिल रोजी हे कंत्राट (टेंडर) छापून आले होते. तटकरे यांच्या आग्रहासाठी आणि शाह यांच्या जेवणासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी का करण्यात आली? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
दरम्यान, अमित शाह यांची भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? अमित शाहांना जेवायला घालायचंय तर खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी? असा सवाल करीत तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा, अशा शब्दात दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करीत सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकारमध्ये खूपच चांगला ताळमेळ जाणवतोय, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.