संभाजी भिडेंना कुत्र्याचा चावा , महापालिकेला खडबडून जाग, भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम
संभाजी भिडेंना कुत्र्याचा चावा , महापालिकेला खडबडून जाग, भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम
img
दैनिक भ्रमर
संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्याची घटना घडली. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. दरम्यान , संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्यानंतर सांगलीचे पालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. महापालिकेच्या डॉग व्हॅनकडून सकाळपासून कुत्रे पकडण्याची मोहीम चालू आहे. आतापर्यंत अनेक कुत्रे पालिकेने पकडले आहेत. भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम आता युद्धपातळीवर चालू आहे. संभाजी भिडे यांना सांगलीतील माळीगल्लीत कुत्रा चावला होता. सांगली शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. ज्या भागात संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला होता त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे.

सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने सोमवारी रात्री हल्ला केला होता. कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला होता. शहरातील माळी गल्लीत हा प्रकार घडला होता. त्यानंतर शासकीय रुग्णालयात संभाजी भिडे गुरुजींवर उपचार करण्यात आले. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शहरातल्या भटके कुत्र्यांना पकडण्यात येत आहे. या घटनेनंतर सांगली मनपा अॅक्सन मोडमध्ये आली आहे. मनपाने शहरातल्या विविध भागात कुत्रे पकडण्याची मोहीम सुरु केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group