दीनानाथचे डॉ.  सुश्रुत घैसास यांच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने दिली  उद्याची मुदत
दीनानाथचे डॉ. सुश्रुत घैसास यांच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने दिली उद्याची मुदत
img
दैनिक भ्रमर

तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणात पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणी वाढल्या आहेत. या महिलेच्या मृत्यू प्रकरणावरून सर्वच स्थरातून या घटनेचा निषेध केला जातोय. आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने घेतली याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

दरम्यान, या महिलेच्या उपचारासाठी १० लाख रुपये मागितल्याचा डॉक्चर घैसास यांच्यावर आरोप आहे तर महिलेच्या आरोग्यबाबतची संवेदनशील माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप रुग्णालयावर आहे.

तनिषा भिसे यांच्यावर तातडीने उपचार करण्यास १० लाख रुपयांची मागणी डॉ. सुश्रुत घैसास यांनी केल्याचा भिसे कुटुंबाचा आरोप आहे. तसेच १० लाखांची पूर्तता न केल्यानेच डॉ. घैसास यांनी उपचार करण्यास नकार दिल्याचेही भिसे कुटुंबाचे म्हणणे आहे. तनिषा भिसेच्या मृत्यूनंतर शासनाने नेमलेल्या तीन समित्यांपैकी दोन समित्यांच्या अहवालात डॉ. घैसास दोषी आढळले आहेत. आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने घेतली याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांना याविषयावर सविस्तर स्पष्टीकरण सोमवारपर्यंत मागितले आहे.

 डॉ.  सुश्रुत घैसास यांना नोटीस देत सोमवारपर्यंत आपले स्पष्टीकरण महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला देण्याचे सांगण्यात आले आहे. त्यांचे स्पष्टीकरण विचारात घेऊन आणि ते तपासून आवश्यकता वाटल्यास त्यावर सुनावणी करून अंतिम निर्णय घेण्यात आली, असे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ विकी रुघवानी यांनी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group