एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी !   कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा  ''या'' तारखेला होईल, परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांची घोषणा
एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ''या'' तारखेला होईल, परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांची घोषणा
img
दैनिक भ्रमर
राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा सात तारखेला होईल असे  आश्वासन परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल,याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल असे नि:संदिग्ध आश्वासन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहे. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि परिवहन आयुक्त विवेक भीमनराव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते.

ते पुढे म्हणाले की,आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन केवळ ५६% देता आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे महिनाभर कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचा पगार दरमहा ७ तारखेला त्यांच्या बॅक खात्यांत जमा करण्यात येईल! त्यासाठी राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन!  परंतु आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही याची जबाबदारी मी घेईन, असे नि: संदिग्ध आश्वासन मंत्री सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिले.

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील १३ कोटी जनतेला सुरक्षितता आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची ” लोकवाहीनी ” आहे असेही ते म्हणाले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group