माझगाव सत्र न्यायालयाने ५ एप्रिल रोजी दिलेल्या निकालात धनंजय मुंडे यांचे अपील फेटाळून लावत त्यांचे आणि करुणा मुंडे यांचे नाते हे पती-पत्नीसारखेच असल्याचे म्हटले आहे. आता यावर करुणा शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
दरम्यान, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. आता फक्त ट्रेलर होता. पिक्चर खूप बाकी आहे. यात त्यांना खूप मोठी शिक्षाही होणार आहे. मंत्रीपद गेलं आहे, आमदारकीही जाणार आहे. मंत्रिपद आमदारकी सोडा असे लोक समाजात राहण्याच्या लायकीचेही नाहीत, अशा शब्दात करुणा शर्मांनी घणाघात केला.
“मी कोणी नाचणारी, गाणारी बाई नाही किंवा ठेवलेली बाई देखील नाही. मी दोन मुलांना जन्म दिलाय. त्यांच्यावर इमानदारीने प्रेम केलंय. कोर्टाने सांगितलंय की मला माझ्या नवऱ्याप्रमाणे लाईफस्टाईल जगण्याचा हक्क आहे, त्यांना या सर्व गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. २७ वर्षे स्वत:च मंगळसूत्र गहाण ठेवून, जितकं शक्य होईल तितकं सर्व करुन मी त्यांना साथ दिली आहे. आज मंत्री झाल्यावर त्यांच्या पैशावर नाचणारी, गाणारी महिला मजा करत आहेत. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, मी ते कोर्टात सादर करणार आहे. मी त्यांच्यासाठी काय त्याग केलाय, तेही कोर्टात सांगणार आहे”, असेही करुणा शर्मांनी म्हटले.
“दर दिवशी नवीन महिला असतात. दर दिवशी नवीन असतात. ही सवय खूप घाण आहे. माझ्या आईचे निधन झालं होतं. तिने आत्महत्या केली होती. मी २००८ मध्ये विष प्राशन केलेले आहे. त्यात पाच दिवस मी रुग्णालयात होते. त्यानंतर माझ्या वहिनीसोबत बलात्कार झाला. माध्या आईने आत्महत्या केली. जसं माझ्यावर आज इतका दबाव टाकतात, तसाच दबाव आईवर टाकला की तिने आत्महत्या केली. स्वतची बायको, दोन मुलांची आई आणि एका महिलेवर अत्याचार करण्याची एक सीमा असते. यांच्याकडे कोणतीही सीमा नाही”, असेही करुणा शर्मा म्हणाल्या.
“या गुंड लोकांकडे अडीच हजार कोटीची संपत्ती यांच्याकडे कुठून आली. यांच्याकडे नाचणाऱ्या गाणाऱ्या वेश्या आहेत. हे हेलिकॉप्टरमधून फिरतात, कुठून आलं हे सर्व यांच्याकडे आणि आज स्वत:ची बायको दोन मुलांसोबत रस्त्यावर कोर्टाच्या चकरा मारते. गेल्या साडेतीन वर्षांपासून कोर्टाच्या चकरा मारतेय. आता फक्त ट्रेलर होता. पिक्चर खूप बाकी आहे. यात त्यांना खूप मोठी शिक्षाही होणार आहे. मंत्रीपद गेलं आहे, आमदारकीही जाणार आहे. मंत्रिपद आमदारकी सोडा असे लोक समाजात राहण्याच्या लायकीचेही नाहीत”, असेही करुणा शर्मांनी म्हटले.