मराठीच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरु असून डोंबिवलीत इंग्रजीत Excuse Me म्हटल्याने चक्क दोन तरूणींना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम म्हणजे जुनी डोंबिवली परिसरात ही घटना घडली आहे. इंग्रजीत Excuse me बोलल्याने तिघांनी दोन तरुणींना मारहाण केली आहे. हिंदीमध्ये बोलायचे नाही मराठीत बोला असे बोलत वाद घालत तरुणींना मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्याचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे.जुनी डोंबिवली परिसरात तरुणी दुचाकीने इमारती जात असताना रस्त्यात उभे असलेल्या तिघांना Excuse me बोलत बाजूला सरकण्यास सांगितल्याने हा वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही तरुणींच्या तक्रारीनुसार विष्णू नगर पोलीस ठाण्यात अनिल पवार ,बाबासाहेब ढबाले,रितेश ढबाले विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.