दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंड वरून भारतात दुर्ग भ्रमंती करण्यासाठी आलेल्या एका युट्यूबर तरुणाला सिंहगड किल्ल्यावर काही मराठी मुलांनी अश्लिल शिवीगाळ शिकवल्याची घटना समोर आली होती. सिंहगडावरील प्रकरण ताज असतानाच आता त्याच परदेशी पर्यटकाला मराठी पोरानं तंबाखू खाऊ घातली असल्याची धक्कादायक आणि लज्जास्पद माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या पर्यटक तरुणाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या परदेशी पर्यटकाला एका मराठी तरुणाने चक्क तंबाखू खायला शिकवण्याची बाब समोर आली. ही घटना मुरूड जंजिरा किल्यावर घडली होती. दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा युट्यूबर एलेन जंजिरा किल्ल्यावर पोहोचला होता. तेव्हा तो एका तरुणाला भेटला. काही वेळ हा तरुण एलेन सोबत चालत होता. त्याला किल्ल्याची माहिती देत होता.
किल्ल्यावर फिरत असताना नंतर तो थांबला आणि त्याने तंबाखू मळली. ही बाब एलेनने बघितली तेव्हा त्याने हे विचारलं हे काय खातोय. त्या तरुणाने ही तंबाखू आहे, तसंत माझ्याकडे पानमसाला सुद्धा आहे. याच्या पुड्याच काढून दाखवल्या, त्यानंतर या मराठी तरुणाने एलेनला तंबाखू खायची का, अशी विचारणा केली. त्यानंतर या तरुणाने तंबाखू मळून दिली आणि कसा खायचं हे देखील शिकवलं.
याहून धक्कादायक बाब म्हणजे, महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा देखील आपल्याकडं असल्याचं सांगत होता. तरुणाने दिलेला तंबाखू एलेनने खाल्ली मात्र त्याला ती सहन झाला नाही. या घटनेनंतर एलेन ने तंबाखू देणाऱ्या मराठी तरुणा पासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अक्षरशः त्याला चकवा देऊन पळून गेल्याचं देखील या व्हिडीओत बघायला मिळतंय. दरम्यान, शिवप्रेमी तरुण या घटनेचा निषेध व्यक्त करत आहे.