नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्विस रोडवर एका चालत्या इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने खळबळ उडाली होती.
मात्र हा हात कुठल्या मृत शरीराचा किंवा कोणा व्यक्तीच्या अपहरणाचा नसून हे कृत्य एक रील बनवण्याच्या नादात काही अतिउत्साही तरुणांनी केल्याचे समोर आलंय. सदर व्हिडिओ पोलिसांना मिळताच पोलिसांनी गाडीचा शोध घेत रील बनविणाऱ्या तरुणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणलं.
यावेळी रील बनवण्यासाठी डिकीत बसलो असल्याचं मुलांनी सांगितलं. तसे व्हिडिओ देखील त्यांनी पोलिसांना दाखवले. मात्र रील बनवण्याच्या नादात समाजात भीती निर्माण करण्याचं काम तरुणांनी केलं असून या तरुणांवर पोलीस काय कारवाई करतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्विस रोडवर एका चालत्या इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने खळबळ माजलीय. हा हात मृत शरीराचा आहे किंवा कोणाचं अपहरणं करुन नेण्याचा प्रयत्न झालाय? याबद्दल शंका व्यक्त करण्यात येतेय. एका वाहन चालकाने सदर व्हिडिओ काढला असून पोलिसांना देखील यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती.