आजकाल कुठे काय घडेल याची कोणीही कल्पना करू शकत नाही. काही गोष्टी तर आपल्या विश्वासाच्या बाहेरच्याच असतात. गेल्या काही दिवसा आधी अशीच एक अजब घटना समोर आली होती. या प्रकरणात चक्क सासूचं आपल्या जावयासोबत पळून गेली होती. दरम्यान आता याच प्रकरणात आणखी एक अपडेट आली आहे. मुलीच्या लग्नाआधीच सासू अपनादेवी होणाऱ्या जावयासोबत पळून गेली. आता ते दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणात एक नवीन अपडेट आहे. अपना देवीचा नवरा जितेंद्र तिला माफ करायला तयार आहे, पण....
अलीगढ येथे जावयासोबत पळून गेलेल्या सासूच्या प्रकरणात एक नवीन अपडेट आहे. अपनादेवी म्हणजे सासूला नवरा जितेंद्र माफ करायला तयार आहे. पण त्याने एक अट ठेवली आहे. जितेंद्रने म्हटलय की, अपनादेवीने माफी मागितली, तर मी माफ करीन. आधी जितेंद्र म्हणालेला की, पत्नीला भेटल्यानंतर तिचा निर्णय तो स्वत: करेल. तिला शिक्षा देणार. तोच जितेंद्र आता पत्नीला माफ करायला तयार आहे. जितेंद्र म्हणाला की, “मुलांसाठी मी बायकोला घटस्फोट देणार नाही. मुलं अजून लहान आहेत, त्यांना आईची आवश्यकता आहे. मी एकटा त्यांना कसा संभाळू?”
अपना देवीने पतीवर आरोप केला की, “तो तिला मारहाण करायचा. घर खर्चाच्या नावाखाली फक्त 1500 रुपये द्यायचा. 6-6 महिने कुठलही काम करत नाही” त्यावर जितेंद्रचे म्हणणं होतं की, “हे सर्व आरोप खोटे आहेत. मी तिला घर खर्चाला पैसे द्यायचो. पण कधी हिशोब ठेवला नाही. बंगळुरुत माझा स्वत:चा बिझनेस आहे. सोबत दूध विक्रीचा सुद्धा व्यवसाय आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्नच येत नाही”
त्याशिवाय अपनादेवीने असाही आरोप केला की, “जितेंद्र आणि त्याच्या मुलीने राहुलसोबत चुकीच्या पद्धतीने आपलं नाव जोडलं. राहुलशी मी बोलली की, दोघे माझ्यासोबत भांडण करायचे. पती एवढ सुद्धा म्हणाला होता की, राहुलसोबत पळून जा. म्हणून मी पळून गेली” जितेंद्रने हे सर्व आरोप फेटाळून लावले.
जावई राहुल आणि अपना देवी 20-20 तास बोलायचे. राहुल माझी मुलगी शिवानीशी बोलायचाच नाही. आम्हाला संशय होता. पण आम्ही कधी त्याला काही बोललो नाही. मुलगी आईला म्हणालेली की, राहुलशी इतकं बोलू नको. त्यावर अपना देवी भडकलेली. तिने मुलीसोबत बोलणं बंद केलं होतं. त्यानंतर एक दिवस मुलीच्याच होणाऱ्या नवऱ्यासोबत पळून गेली. जितेंद्रने आरोप केला की, अपनादेवी घरातून पळून जातान पाच लाखाचे दागिने आणि तीन लाख रुपये कॅश घेऊन फरार झाली.