
१८ एप्रिल २०२५
नियोजित वधुचे अफेअर उघड झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या आयकर अधिकारी असलेल्या वराने लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकमधील आयकर अधिकारी असलेल्या हरेकृष्ण पांडे यांचा उत्तरप्रदेशातील एका युवतीबरोबर साखरपुडा झाला होता. साखरपुड्याच्या कार्यक्रमाला नियोजित वधुचा प्रियकरही हजर होता. या कार्यक्रमात नियोजित वधुने या प्रियकराला सर्वांसमोर मिठी मारली. त्यामुळे हे प्रेमसंबध उघड झाले.
त्यानंतर वराने हा विवाह मोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नियोजित वधुने लग्न कर नाही तर हुंडा मागीतल्याच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पांडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दि.18 रोजी त्यांचा वाराणसी येथे विवाह होणार होता. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright ©2025 Bhramar