बीडमधील गुन्हेगारीच्या प्रमाणात सध्या चिंताजनक वाढ होताना दिसतेय. दरम्यान आता पुन्हा एकदा अशीच माहिती समोर येतेय. सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली गेली असल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान आता या प्रकरणास नवं वळण मिळालं आहे.
ध्वनिप्रदूषणाची तक्रार केली म्हणून महिला वकिलाला बेदम मारहाण केल्याची घटना अंबाजोगाईमध्ये घडली आह. सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार केली म्हणून महिला वकिलाला दहा ते बारा पुरुषांनी रिंगण करून अमानुष मारहाण केली. क्रूरतेचा कळस गाठला असून महिलेची पाठ काळी निळी होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. राज्यभरत संतापाची लाट पसरलेली असताना या प्रकरणाला वेगळ वळण मिळालं आहे. वकील महिलेला तिच्याच घरच्यांनी मारहाण केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या अगोदर देखील तिने असे खोटे गुन्हे दाखल केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
गावातील एक महिला म्हणाली, महिलेने केलेले आरोप खोटे आहेत. तिच्याच घरच्यांनी तिला मारले आहे.तिला गावातील गिरणीचा पण त्रास होत असे, मग आम्ही धान्य कुठं दळून आणायचं? असा सवाल केला. तिने गिरणीचालकाला देखील अतिशय अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या आहेत. या अगोदर देखील खोटा गुन्हा दाखल झाला होता. तिच्याच आजोंबाना तिने मारहाण केली आणि आरोप दुसऱ्या व्यक्तीवर केला, अखेर ते पुढे सिद्ध झाले. आतापर्यंत अर्ध्या गावावर गुन्हे दाखल केले आहेत, हा तिच्याच घरच्यांचा प्लॅन आहे
वकिलीच्या जोरावर तिला चांगलं माहीत आहे कायदा कसा वापरायचा आणि कसा फिरवायचा त्यामुळे अगणित खोटे गुन्हे दाखल केले आहेत. पुढे कोर्टात देखील सिद्ध झाला. अनेक लोकांवर तिने गुन्हे दाखल केले आहेत. कायद्याचा गैरवापर करत तिने खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्या महिलेला कोणी मारले नाही, तिच्या घरच्यांसोबत भांडण झाले, मात्र गुन्हा 10 सगळ्यांवर दाखल केला आहे. तिला गावतल्या कोणीच मारहाण केली, असेही एक ग्रामस्थ म्हणाले.
अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला सरपंच व इतर दहा जणांनी 14 एप्रिल रोजी लाकडी काठी आणि रबरी पाईपने मारहाण केली. या प्रकरणात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात त्याच दिवशी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.तक्रार केली म्हणून महिला वकिलाला दहा ते बारा पुरुषांनी रिंगण करून अमानुष मारहाण केली. गावातील सरपंच आणि इतर व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान असं मारहाण झालेल्या पीडित महिलेचे नाव आहे.अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीलीचा व्यवसाय करते.