गेल्या काही दिवसांआधी बुलढाणा जिल्ह्यात लोकांचे अचानक केस गळती सुरु होऊन टक्कल पडू लागले होते. या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान आता जळगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चौगाव अनेक ग्रामस्थांना किडनीच्या विकारांची लागण झाली असून किडनीच्या विकाराने गेल्या सहा वर्षात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, रुग्णांमध्ये आबाळ, वृद्ध, महिलांसह तरुणांचा देखील समावेश असल्याची चिंताजनक बाब आहे. गावातील पाण्यात क्षार जास्त असल्यामुळे तसंच पाण्यात दोष असल्यामुळेच किडनीचा विकास जडल्याचे डॉक्टरांकडून निदान झाल्याचे रुग्ण असलेल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
आजोबा, वृद्ध, तसंच महिला आहेत या सर्वांना किडनीच्या आजाराची लागण झाली आहे. काही दोन वर्षांपासून तर काही सात ते आठ वर्षांपासून लागण झाली असून उपचार सुरू आहे. सुरुवातील उलटी होणे, अवयवांना सूज अशी लक्षणे आढळल्यानंतर संबंधित वृद्ध तसंच महिलांनी रुग्णालय गाठले, तपासण्या केल्यानंतर किडनीला सूज, किडनीचा विकार असल्याचे निदान झाल्यानंतर संबंधित ग्रामस्थ हादरले. गावातील पाण्यात दोष असल्यामुळेच किडनीचा विकास झाल्याचे या रुग्णांना त्या त्या डॉक्टरांनी सांगितलं.