बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण सध्या वाढतच चालले असून अनेक गंभीर प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. दरम्यान, आता अशीच धक्कादायक घटना बीड मध्ये घडली आहे. बीड जिल्हा पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे हादरला आहे. हॉटेलमधील ग्राहकांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकाच्या महागात पडले असून यामध्ये हॉटेल मालकाचा मृत्यू झाला आहे. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव गायकवाड असे ढाबा चालवणाऱ्या मालकाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास काही तरुण ढाब्यावर जेवायला आले. जेवण झाल्यानंतर आरोपींनी बाहेरून दारू आणली आणि ते पित बसले होते. दरम्यान दारू पिताना त्यांच्यात भांडण झाली. ही भांडण सोडण्यासाठी हॉटेल मालक महेश गायकवाड आणि त्यांचा मुलदा आशुतोष गायकवाड मध्यस्ती करण्यासाठी गेले. त्यानंतर आरोपींनी मालकाशी वाद घालायला सुरुवात केली, हा वाद इतका पेटला की तरूणांनी शिवीगाळ करत मालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी हॉटेल नुकसान केले, पैसे चोरले , मारहाण केली आणि निघून गेले या भांडणात महादेव गायकवाड हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तर हल्ल्यात जखमी झालेल्या हॉटेल मालकाच्या मुलाला उपचारासाठी संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरूणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.रोहित थावरेसहा सहा आरोपी फरार आहेत . माजलगाव ग्रामीण पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. क्षुल्लक कारणांवरून एका ढाबा मालकाची हत्या करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.