सर्वात सामान्य वर्तणुकीशी संबंधित व्यसनांपैकी एक म्हणजे जुगाराचे व्यसन. ऑनलाईन गेमींग पासून लांब राहा. त्या आर्थिक जोखीम आहे असं वारंवार सांगून ही अनेक तरुण या ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेलेले दिसतात. यातून काही तरूण अक्षरश: रस्त्यावर आले आहेत. त्यांचे पुर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे. असा प्रकार सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डवाडीतल्या तरुणाबरोबर घडल्याचे समोर आले आहे.
या तरुणाने ऑनलाईन जुगारात 90 लाख रूपये, 6 एकर जमीन, 2 तोळे सोने गमावलं आहे. आता हरलो पुढच्या वेळी जिंकेल या नादात त्यांनी सर्व संपत्ती हातची गमावली आहे. आता त्याला रस्त्यावर येण्या शिवाय पर्याय राहीला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार , बालाजी खरे असे या तरुणाचे नाव असून त्याचे शिक्षण आठवी पर्यंत झाले आहे. त्याच्या कुटुंबात 9 जण आहेत. घरातली ही लोक बाहेर कामाला जातात. घरची 12 एकर शेती होती. जुगारा पोटी ही शेती त्याने हळूहळू विकली.
गेल्या दोन वर्षापासून तो हा ऑनलाईन जुगार खेळत आहे. दिवसभर त्यासाठी तो मोबाईलवर असायचा. पण त्याला त्यात कधी पैसे मिळाले नाहीत. उलट त्याला पैसे गमावण्याची वेळ आली.
‘चक्री गेम' हा एक ऑनलाईन जुगाराचा प्रकार आहे, ज्यामध्ये खेळाडूंना झटपट पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले जाते. परंतु, अनेक वेळा हे आमिष फसवणुकीत परिवर्तित होते, ज्यामुळे अनेक तरुण आर्थिक अडचणीत सापडतात.
बालाजी याने हा गेम खेळण्यासाठी एजंटना लाखो रुपये दिले आहेत. हा खेळ खेळण्या पूर्वी त्याला पैसे या एजंटला द्यावे लागत होते. ते पैसे तो ऑनलाईन ट्रान्स्फर करायचा.
त्यानंतर त्याला हा गेम खेळता येत होता. नेहमी पैसे गमावणाऱ्या बालाजीला आपण एक दिवस जिंकू आणि गेलेले पैसे आपल्याला परत मिळतील या आशेने तो खेळत राहीला. गेलेले पैसे सोडा होते तेवढे पैसे जमीन ही त्याने या नादात गमावली आहे.
या प्रकरणानंतर आपली फसवणूक होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिसात तक्रार केली. स्थानिक पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तसेच, रायगड जिल्ह्यातही अशा ऑनलाईन जुगाराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे . अशा ऑनलाईन जुगाराच्या प्रकारांपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे.