संतापजनक : आईच्या प्रियकराकडून दोन चिमुकल्यांवर अत्याचार
संतापजनक : आईच्या प्रियकराकडून दोन चिमुकल्यांवर अत्याचार
img
DB
जालना : लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत असताना प्रियकराने महिलेच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे. जालना शहरात सदरची धक्कादायक घटना समोर येत आहे.

पीडित चिमुकल्यांची आई ही जुना जालना भागात मोलकरीण म्हणून काम करते. तर तिचा प्रियकर एका हॉटेलात मॅनेजर असल्याची माहिती समोर आली आहे. तर हे दोघेही मागील दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जुना जालना भागात राहत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यांच्यासोबत महिलेच्या दोन मुली देखील वास्तव्यास होत्या.

दरम्यान लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलेच्या प्रियकरानेच दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रशांत प्रकाश वाडेकर असं या नराधमाचे नाव असून त्याने सहा आणि चार वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच समोर आल आहे. सदर प्रकार लक्षात आल्याने  चिमुकल्यांच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.

 याप्रकरणी जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर घटनेचा तपास करत पोलिसांनी संशयित आरोपी प्रशांत प्रकाश वाडेकर याला अटक केली.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group