नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या सात मोटारसायकली एका तरुणाने खोडसाळपणे कशाने तरी आग लावून पेटवून देत नुकसान केल्याची घटना नांदूर नाका येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मिलिंद हरिषचंद्र म्हस्के (रा. मखमलाबाद नाका, पंचवटी) यांचे जत्रा हॉटेल ते नांदूर नाका रोड येथे श्रीमंत योगी सोसायटीतील मातोश्री ऑटोमोबाईल नावाचे मोटारसायकल गॅरेज व स्पेअरपार्ट विक्रीचे दुकान आहे. या गॅरेजमध्ये पंकज पाचोरे यांची एमएच 17 बीआर 4273, आरपी विश्वकर्मा यांची एमएच 15 एसएस 3863, अनिल पगार यांची एमएच 15 ईडब्ल्यू 2683, किरण सालगुडे यांची एमएच 15 सीएफ 5556, सुभाष पोले यांची एमएच 18 एई 7683, नागेश कानकुटे यांची एमएच 15 सीयू 5440 व आशिष आहिरे यांची एमएच 15 बीएफ 8479 या क्रमांकांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोटारसायकली सर्व्हिसिंग व दुरुस्तीसाठी आल्या होत्या.
आरोपी प्रेम अशोक खलसे (रा. श्रीमंत योगी सोसायटी, नांदूर रोड, नाशिक) याने खोडसाळपणे गॅरेजच्या शेडमध्ये असलेल्या या सर्व सात वाहनांना कशाच्या तरी सहाय्याने आग लावून पेटवून देत सुमारे 2 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केले.
या प्रकरणी गॅरेजमालक मिलिंद म्हस्के यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात प्रेम खलसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करीत आहेत.