राज्यातील महिला सुरक्षितेतचा प्रश्न ऐरणीवर असून काही दिवसांपूर्वी स्वारगेट येथे एका 26 वर्षीय तरुणीवर बस मध्ये अत्याचार झाला असल्याची धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून तरुणीने धक्कादायक माहिती दिली आहे.
दत्तात्रय गाडे या आरोपीने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून तिला शिवशाही बसमध्ये नेले होते आणि तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान, आता दत्तात्रय गाडे याने या तरुणीवर एकदा, दोनदा बलात्कार केल्याची तरुणीच्या वैद्यकीय तपासणीतून समोर आली आहे. तर महिन्याभरानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपीने तरूणीवर तिसऱ्यांदा देखील बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीनेच ही माहिती दिली आहे.
पीडित तरूणीने राज्याच्या प्रधाव सचिवांना पाठवलेल्या पत्रात हा उल्लेख पीडित तरूणीने केला आहे. एवढच नव्हे तर स्वारगेट प्रकरणातील पीडीत तरूणीने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. अनेक पुरुष अधिकाऱ्यांनी माझ्यावर कसा अत्याचार केला हे सांगायला लावल्याचं देखील तरुणी म्हणाली. पुरूष वैद्यकीय अधिकारी इच्छा नसताना माझी संमती घ्यायचे , माझी वैद्यकीय चाचणी करायचे, असा देखील आरोप तरूणीने केला आहे.ॲड. असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची मागणी केलेली असताना ही पुणे पोलिसांनी परस्पर केली. अजय मिसार यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली.
दरम्यान, पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये दत्तात्रय गाडे याने पीडित तरुणीवर एकदा नव्हे तर दोनवेळा बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पीडितेने लिहिलेल्या पत्रात तिसऱ्या बलात्काराच्या प्रयत्नाचा देखील उल्लेख आहे. तरूणी म्हणाली, आरोपी दत्ता गाडेने माझ्यावर दोन वेळा बलात्कार केला. तिसऱ्यांदा अनैसर्गिकपणे बलात्काराचा प्रयत्न केला. पूर्ण ताकदीनं मी विरोध केला त्यानंतर दत्ता गाडे पळून गेला.
आरोपी दत्तात्रय गाडे याच्या न्यायालयीन कोठडीत 8 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गाडेच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर काल त्याला कारागृहातून त्याला व्हिडिओ कॉन्फरसिंग त्याला न्यायालयात हजर केले. त्याला कारागृहात भेटण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती त्याचे वकील वाजेद खान-बिडकर यांनी केली. तर या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची विनंती पुणे पोलिसांनी गृह विभागाकडे केली आहे.