सोलापूरमधील नामांकित शाळेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या शाळेमधील शिपायाने चिमुकल्या मुलीचा लैंगिक छळ केला. याप्रकरणी या शिपायाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरमधील एका शाळेमध्ये शिपायाने चिमुकल्या मुलीचा लैंगिक छळ केला. या शिपायाने शाळेच्या परिसरातील बाथरुममध्ये नेऊन या मुलीचा लैंगिक छळ केला. पीडित मुलीच्या शरीरावरील विविध भागांवर या शिपायाने चिमटे काढत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला तेव्हा ही घटना उघडकीस आली.
मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ५५ वर्षीय शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्रान्सिस आशिष पिंटो असं या आरोपी शिपायाचे नाव आहे. डिसेंबर २०२४ पासून २४ मार्चपर्यंत या शिपायाने या मुलीचा लैंगिक छळ केला असल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोलापूरातील नामांकित शाळेत ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.