Nashik : डॉक्टरच्या घरात घुसून टोळक्याचा धुडगूस
Nashik : डॉक्टरच्या घरात घुसून टोळक्याचा धुडगूस
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- “तुमच्या अकाऊंटला टाकलेले 20 लाख रुपये कुठे आहेत? ते आम्हाला परत द्या,” अशी मागणी करीत सहा जणांच्या टोळक्याने एका डॉक्टरच्या घरात घुसून धुडगूस घातल्याची घटना कॉलेज रोड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी डॉक्टर संजय चंपालाल मुंदडा (रा. येवलेकर मळा, कॉलेज रोड, नाशिक) व त्यांच्या कुटुंबातील सदस्य असे सर्व जण काल (दि. 4) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरात होते. त्यावेळी अनोळखी सहा लोक मुंदडा यांच्या घरी आले व घराचा दरवाजा ढकलून आरडाओरडा करीत घरात घुसले. त्यातील एका इसमाने विचारले, की ब्रिजेश मुंदडा कुठे आहेत? हा सर्व आवाज ऐकून घरातील सर्व सदस्य हॉलमध्ये आले.

त्यावेळी एका आरोपीने विचारले, की आम्ही तुमच्या अकाऊंटला टाकलेले 20 लाख रुपये कुठे आहेत? ते आम्हाला परत द्या. त्यावेळी फिर्यादीचा पुतण्या सिद्धार्थ हा बोलला, की तुमच्यातील एकाने येथे थांबावे व बाकीच्यांनी बाहेर जावे. तेव्हा टोळक्याने फिर्यादीचा भाऊ ब्रिजेश याला पकडून बाहेर घेऊन जाऊ लागला, तसेच ब्रिजेश याला मारण्यास व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी घरातील सर्व सदस्य हा वाद सोडविण्याचा प्रयत्न करीत होते.

त्यावेळी घरातील सदस्यांना धक्काबुक्की केली. काहींचे कपडे फाडले. या झटापटीत ब्रिजेश याच्या गळ्यातील सोन्याची चेन दरवाजाजवळ पडली; मात्र ती मिळून आली नाही. त्यानंतर घरात घुसलेले टोळके हे दरवाजाजवळ असलेले चप्पल स्टॅण्ड उचलून फिर्यादीच्या दिशेने फेकून निघून गेले. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अनोळखी सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group