अमानुषतेचा कळस !  कुत्र्याला दुचाकीला बांधून अख्खं गाव फरफटत नेलं, कुठे घडली घटना ?
अमानुषतेचा कळस ! कुत्र्याला दुचाकीला बांधून अख्खं गाव फरफटत नेलं, कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर
काहींची प्राण्यांप्रती  इतकी अमानुष वृत्ती  असते की  त्यांना आपण काय करतोय याच सुद्धा भान राहत नाही. अशीच काहीशी धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने अमानुषतेचा कळस गाठत चक्क एका भटक्या कुत्र्याला दोरीने दुचाकीला बांधून फरफट नेल्याचा अत्यंत अमानुष प्रकार जळगाव शहरात घडला आहे.  

भटक्या कुत्र्याला दोरीने दुचाकीला बांधून फरफट नेल्याची संताजपनक घटना उघड झाली आहे. बकरीला कुत्रा चावल्याच्या रागातून एका तरुणाने हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी जळगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सलिम अन्सारी असं या तरुणाचं नाव आहे. सलिम अन्सारी आज गुरुवारी सकाळी एका कुत्र्याला पकडलं आणि दोरीनं बांधलं. त्यानंतर त्याने आपल्या मोटारसायकलच्या मागील बाजूस कुत्र्याला दोरीने बांधलं आणि त्याला फरफटत नेत होता. हा प्रकार लक्षात येताच भाग्येश मगर यांनी मोटारसायकलस्वाराला थांबवून विचारणा केली असता, अन्सारीने सांगितले की, त्या कुत्र्याने त्याच्या बकरीला चावा घेतला होता, म्हणून तो कुत्र्याला अशा पद्धतीने नेत होता.

भाग्येश मगर आणि त्यांच्या काही मित्रांनी सलिमला थांबवलं. त्वरित हस्तक्षेप करून कुत्र्याला सोडवलं. दुचाकीनं फरफटत नेल्यामुळे या कुत्र्याला अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. जखमांनी विव्हळत या कुत्र्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या प्रकरणी भाग्येश मगर यांनी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात सलिम अन्सारी विरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे एमआयडी पोलिसांनी अन्सारीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group