नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलास बंद पडलेल्या बिल्डिंगमध्ये घेऊन जात त्याच्याशी अश्लील वर्तन करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही भद्रकाली परिसरात राहते. फिर्यादी महिलेचा 13 वर्षीय मुलगा हा दि. 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शालिमारच्या बाजूने सायकलीने येत होता. त्यावेळी आरोपी भुश्या व लड्ड्या (पूर्ण नावे माहीत नाहीत) या दोघांनी या मुलाची सायकल रस्त्यात अडवली. त्याला शालिमार सिग्नल ते कल्पराज दुकानाच्या बेसमेंटला पार्किंगमध्ये असलेल्या जनरेटरच्या रूमच्या बाजूला मोकळ्या जागेत व बंद पडलेल्या बिल्डिंगमध्ये घेऊन गेले.
तेथे दोघा आरोपींनी अल्पवयीन मुलाशी अश्लील वर्तन करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.