धक्कादायक घटना : शेजारच्या बाईने दिला
धक्कादायक घटना : शेजारच्या बाईने दिला "तो" सल्ला अन् आईने पोटच्या मुलाचीच दिली .....
img
Dipali Ghadwaje
आईनेच आपल्या पोटच्या मुलाच्या हत्येची सुपारी देऊन त्याला संपवल्याची धक्कादायक घटना संभाजीनगरमधील पैठणमध्ये  उघडकीस आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , 16 मार्च रोजी संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यात एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण होते आणि वैद्यकीय अहवालातही हे घातपात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला. विशेष म्हणजे, मृताच्या आईनेच या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

तपासादरम्यान , पोलिसांनी धक्कादायक सत्य उघडकीस आणले. मुलाला दारूचे व्यसन होते आणि त्याची पत्नी त्याच्या व्यसनामुळे माहेरी निघून गेली होती. तो रोज दारू पिऊन आईकडे पैशांसाठी आणि इतर चुकीच्या गोष्टींसाठी तगादा लावत होता. त्याच्या सततच्या त्रासामुळे आई पूर्णपणे हतबल झाली होती.

एक दिवस, आईने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेकडे आपल्या व्यथा सांगितल्या. त्या महिलेने तिला 'अशा मुलाला कायमचा संपव' असा धक्कादायक सल्ला दिला. हताश झालेल्या आईने त्याच सल्ल्याचे पालन करण्याचे ठरवले.

आईने किरण गायकवाड नावाच्या एका गुंडाला मुलाला मारण्यासाठी 20 हजार रुपयांची सुपारी दिली. त्यापैकी १८ हजार रुपये आगाऊ देण्यात आले आणि उर्वरित दोन हजार रुपये काम झाल्यावर देण्याचे ठरले. किरणने आपल्यासोबत विजय जाधव नावाच्या आणखी एका व्यक्तीला सामील करून घेतले.

किरण आणि विजयने योजना आखली. त्यांनी त्या तरुणाला दारू पिण्याच्या बहाण्याने संत ज्ञानेश्वर उद्यानात नेले. तिथे त्यांनी दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. त्याची ओळख पटू नये म्हणून त्यांनी त्याच्या तोंडाला चिखल लावला आणि त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला.

मात्र, पोलिसांच्या तपासात हे सगळे षडयंत्र उघड झाले. पैठण पोलिसांनी आई, किरण गायकवाड आणि विजय जाधव यांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे .
इतर बातम्या
Join Whatsapp Group