
मुंबई :- 15 लाख रुपयांची लाच घेताना जीएसटीच्या उपायुक्तांना व एका खासगी इसमाला लाच लूचपत प्रतिबंधक
विभागाने रांगेहाथ पकडले आहे.
तात्यासाहेब ढेरे, उप आयुक्त, वस्तु व सेवा कर विभाग, पळघर (वर्ग 1) व खाजगी इसम एकनाथ पेडणेकर, टॅक्स कन्सल्टन्सी अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी केलेले तक्रारीवरून दि. 28/2/25 रोजी केलेल्या तक्रारी वरुन दि. 8/3/2025 रोजी चे पडताळणीमध्ये वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त तात्यासाहेब ढेरे, व खाजगी इसम एकनाथ पेडणेकर यांनी तक्रारदार यांच्या फर्मने तयार केलेल्या उत्पादनाचे खरेदी विक्री बाबत त्यांना दंडासह आकारण्यात आलेल्या वस्तू व सेवा (जीएसटी) कर रक्कम कमी करून देण्याकरता पेडणेकर यांनी 15,00,000 रूपये तात्यासाहेब ढेरे यांच्या करिता मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यास तात्यासाहेब ढेरे यांनी सहमती दर्शवली होती.
त्यानुसार दि. 9/3/2024 रोजी कऱण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान तात्यासाहेब ढेरे व पेडणेकर यांनी तक्रारदार यांना अंधेरी येथील पेडणेकर यांचे ऑफिस बाजुस असलेल्या चीमतपाडा रोड येथील अनिरुद्ध हॉटेल येथे तक्रारदार यांना बोलवून सदर ठिकाणी मागणी केलेली लाचेची रक्कम 15 लाख रुपये लाचेची रक्कम एकनाथ पेडणेकर यांनी हॉटेल मधील टेबलच्या खालील बाजुस ठेवण्यास सांगितली.
या प्रकारास तात्यासाहेब ढेरे यांनी समक्ष सहमती दर्शवून ते या ठिकाणावरून निघुन गेल्याने पेडणेकर यास 15,00,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले. उपायुक्त ढेरे यांचा शोध चालू असुन त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.