पंचवटीत खासगी सावकार महिलेविरुद्ध कारवाई
पंचवटीत खासगी सावकार महिलेविरुद्ध कारवाई
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- खासगी सावकारी करणार्‍या महिलेच्या घरी छापा टाकून पथकाने कोरे चेक उसनवार दस्त मालमत्ता खरेदी-विक्रीसंबंधीची कागदपत्रे असे साहित्य जप्त करण्यात आले.



याबाबत सरकारी अधिकारी प्रदीप गोविंदराव महाजन (रा. मखमलाबाद रोड, पंचवटी) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की स्वाती रामराजे (रा. शिंदेनगर, पंचवटी) ही महिला खासगी सावकारी करीत असल्याची माहिती सरकारी कार्यालयास मिळाली. ही महिला जादा व्याजाने पैसे देऊन लोकांना त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली होती.

त्याची दखल घेऊन पथकाने रामराजे यांच्या घरी छापा टाकला. त्यावेळी अर्जदारासह अनेक नागरिकांच्या सह्या केलेले कोरे चेक, हातउसनवार दस्त, नोटरी, मालमत्ता खरेदी-विक्रीसंबंधी कागदपत्रे आढळून आली. यावरून ही महिला अवैधरीत्या सावकारी व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात स्वाती रामराजे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group